Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डीलर असल्याचे भासवून महिलेची तीन लाखात फसवणूक; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवून वरणगाव येथील ३४ वर्षीय महिलेला २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री धनराज महाजन (वय-३४) रा. मकरंद नगर, वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २१ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांना सुधीर शर्मा रा. १२ चौक स्टेशन रोड गिरिदिह झारखंड या नामक व्यक्तीने इंडिया मार्ट वरून बोलत असल्याचे सांगून स्वतः रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवून जयश्री महाजन यांना माहिती सांगितली. त्यानुसार जयश्री महाजन यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांनी ३७ रेफ्रिजरेटर, ७ एसी आणि एक वाशिंग मशीन अशी ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर जयश्री महाजन यांनी २ लाख ९७ हजार ५०७ रुपये ऑनलाइन पैसे पाठवले. परंतु पैसे पाठवून देखील समोरील व्यक्तीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कोणताही माल घरापर्यंत पोहोचविला नसल्याने त्यांनी वारंवार फोन केले. त्यानंतर त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जयश्री महाजन यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात सुधिर शर्मा (पूर्ण नाव माहित नाही) या नामक व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आशिष अडसूळ करीत आहे.

Exit mobile version