Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काँग्रेस भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस डिजीटल मेंबरशीपसाठी युवक काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नोंदणीस प्रारंभ झाला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात पक्षाच्या सदस्यांची नोंदणी ही डिजीटल पध्दतीत करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने आजपासून जिल्हा कॉंग्रेसतर्फे डिजीटल सदस्यता नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महानगराध्यक्ष शाम तायडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील, मुफ्ती हारून नदवी आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून डिजीटल नोंदणीमागचा हेतू विशद केला. या माध्यमातून पक्षाकडे तरूण आकर्षीत होणार असून युवक कॉंग्रेस जिल्ह्याच्या कान्याकोपर्‍यातून याचा संदेश घेऊन जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल सदस्यता नोंदणी सुरू करण्याचा प्रयत्न अतिशय उपयुक्त ठरणारा असून यातून पक्ष बांधणीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील यांनी केले. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डिजीटल सदस्यता नोंदणी मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी डिजीटल नोंदणीमुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार असून सर्वांनी एकत्रीतपणे ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

खालील व्हिडीओजमध्ये पहा जिल्हा कॉंग्रेसच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ

Exit mobile version