Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डीआयजी निशिकांत मोरे निलंबीत – गृहमंत्री

dig more case

मुंबई, वृत्तसंस्था | मुलीच्या विनयभंगप्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा आदेश गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले आहे.

Exit mobile version