Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेलची चोरी

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एअरटेल मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून ५० लिटर डिझेलची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील‍ शिवाणी शिवारात सिंधी गावाजवळ एअरटेल टॉवर लावण्यात आले आहे. या टॉवरच्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्थान करण्यात आली आहे. दरम्यान, २२ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जनरेटरमधून ५ हजार रूपये किंमतीचे २० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविंद्र अरविंद पाटील रा. निमखेडी शिवार जळगाव यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश ब्राम्हणकर करीत आहे.

 

Exit mobile version