Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणीताई खडसे यांची बंजारा बांधवांसोबत धुलीवंदन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे गेल्या तीस वर्षांपासून बंजारा समाजासोबत धुळवड साजरी करत आहेत. मात्र, यंदा रोहिणीताई खडसे यांनी जोंधनखेडा, टाकळी, मोरझिरा, बोरखेडा, उमरा येथे जाऊन धुलिवंदन साजरे केले.

त्यांचा कित्ता गिरवत जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा, टाकळी, मोरझिरा, बोरखेडा, उमरा या बंजारा तांड्या वर जाऊन बंजारा समाज बांधवां समवेत धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी पारंपरिक बंजारा पोशाख परिधान केला होता. बंजारा पोशाख परिधान करून त्यांनी बंजारा भगिनी समवेत त्यांचे पारंपरिक नृत्य केले व रंग लावला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि. प. सदस्य निलेश पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, माजी प. स. सभापती विकास पाटील, प्रदिप साळुंखे, ता.सरचिटणीस रविंद्र दांडगे, माजी सरपंच डॉ. बि. सी. महाजन, रणजित गोयनका, नितीन कांडेलकर, राजु सेठ खंडेलवाल, शिवा पाटील, रवींद्र पाटील, संतोष कांडेलकर, पुंडलिक कपले, विशाल रोठे, प्रवीण कांडेलकर, बाळा सोनावणे, नरसिंह चव्हाण, रामभाऊ भवरे, संदीप पाटील, मनोहर निबाळकर, विलास हिरोळे, शंकर मोरे, विवेक पाटील, सुशिल भुते, शुभम खंडेलवाल, अविनाश पाहळे, सागर पाटील, मयुर साठे, रसाल पवार, माजी सरपंच ममराज पवार, माजी सरपंच, संतोष चव्हाण,अर्जुन राठोड, मागो चव्हाण, धनराज चव्हाण, औंकार चव्हाण, तुकडू पवार, विनोद मुंडे, समाधान पाटील, मुक्तार भाई, मेहमूद खान, मेघराज जाधव, महेंद्र मुंडे, जाफर शाह, राजू विटोकार, संतोष जाधव, अमर गायकवाड, नरसिंह जाधव, सागर वाकोडे, सचिन बोदडे, शाहरुख खान, रामू बोदडे उपस्थित होते.

 

Exit mobile version