Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय

धुळे प्रतिनिधी । धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांचा विजय निश्‍चि झाला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल आणि काँग्रेसचे अभिजीत पाटील यांच्यात सरळ मुुकाबला होता. आज सकाळी या निवडणुकीची मतमोजणी झाली. यात अमरीश पटेल यांना ३३२ तर अभिजीत पाटील यांना ९८ मते मिळाली. यामुळे अमरीश पटेल यांनी एकतर्फी विजय संपादन केला आहे. येथे याआधी अमरीश पटेल हेच आमदार होते. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तेच पुन्हा निवडून आले आहेत. दरम्यान, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

Exit mobile version