Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धोबी समाजाचं 19 जुलैपासून मुंबईत आमरण उपोषण

भुसावळ प्रतिनिधी । येथील धोबी समाजाकडून येत्या 19 जुलैपासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण पुकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील धोबी समाजाला १९५७ पूर्वी असल्याप्रमाणे व देशात १७ राज्ये व ५ केंद्र शासित प्रदेशात असलेल्या अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण पूर्ववत लागू व्हावे, म्हणून समाजाच्या ३० वर्षांपासूनच्या लढाईकडे व रास्त मागणीकडे प्रत्येक सत्तेतील सरकारने वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे, भाजपा सरकारने सुद्धा गेल्या साडेचार वर्षात समाजाला निव्वळ आश्वासने मिळाले आहेत. धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील धोबी समाजाने
पूर्वत आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण लढा चालू ठेवला असतांना १९९२ मध्ये तत्कालीन मंत्री डॉ.दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने राज्यातील धोबी समाज अस्पृश्यतेचे निकष पूर्ण वारीत असल्याने व भारतातील इतर राज्यात धोबी जातीला अनसूचित जातीच्या सवलती मिळत असल्याने महाराष्ट्रात सुद्धा धोबी समाजाला अनुसूचित जात प्रवर्गाच्या यादीत समाविष्ठ करण्याची स्वयं स्पष्ट शिफारस असलेला अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांपासून हा समाजाच्या हिताचा अहवाल शासन दरबारी धुळखात पडून आहे. वारंवार आंदोलने, निवेदने व मोर्चे काढून दरवेळी फक्त आश्वासन देऊन धोबी समाजाला न्यायापासून वंचित ठेवण्यात आले. फडवणीस सरकारकडून भ्रमनिराशा झाल्याने राज्यभरातील समाजात प्रचंड खदखद व रोष आहे.
धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात म्हणून डॉ.दशरथ भांडे समितीचाअहवाल केंद्राला पाठवण्यात यावा, ह्या समाजाच्या मुख्य मागणी मान्य व्हावी यासाठी समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी येत्या १९ जुलै पासून आमरण उपोषण पुकारले आहे.

राज्यातील प्रमुख पदाधिका-यांसह सर्व जिल्हाध्यक्ष व समाजाच्या अनेक तरुणांनी आमरण उपोषण आंदोलनाचा पावित्रा जाहीर केला आहे. बेमुदत चालणा-या या आंदोलना दरम्यान समाजाच्या संघटनेच्या विविध फ्रंटलचे १ हजार लोक साखळी उपोषण करुनआंदोलनाला पाठिंबा देतील, असे नियोजन असून समाजाची आरक्षणाची प्रलंबित मागणी पदरात पाडल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा संकल्प राज्य पदाधिका-यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील धोबी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. राज्यभरातील धोबी समाजाच्या बंधु-भगिनी यांनी आमरण उपोषणाला पाठिंबा व शासनाला जाब विचारण्यासाठी दैनंदिन नियोजनाप्रमाणे साखळी उपोषणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश ठाकरे, जिल्हा सचिव गोपाळ दावस्कर, जि.संघटक लक्ष्मण शेलोडे, भुसावळ तालुका अध्यक्ष नरेंद्र दाइ, मनीष बाविस्कर, महिला जिल्हाध्यक्ष शोभा साढे,
जिल्हाध्यक्ष द डेब्जी फोर्सचे संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

Exit mobile version