Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डीएचएफएलचे संचालक मंडळ बरखास्त

DHFL

मुंबई वृत्तसंस्था । कर्जरोख्यांचा परतावा देण्यास अपयशी ठरलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संचालक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने बुधवारी केली.

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीच्या कारभारासंबंधी चिंता आणि अनेकांची देणी थकविणे आणि दायीत्वाच्या पूर्ततेतील कसूर लक्षात घेऊन डीएचएफएलचा कारभार प्रशासकाकडे सोपवत असल्याचे स्पष्ट केले. इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियन यांची डीएचएफएलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आयएल अ‍ॅण्ड एफएस लिमिटेडला कर्ज परतफेडीतील अपयश पुढे आल्यानंतर, अनेक बँकेतर वित्तीय कंपन्यांपुढे रोकड तरलतेची मोठी समस्या निर्माण झाली. डीएचएफएलनेही सरलेल्या जूनपासून विविध मुदतीची देणी फेडता आलेली नसून, कर्जदात्या बँका आणि म्युच्युअल फंडांनांही याचा फटका बसला आहे. प्रस्तावित दिवाळखोरी प्रक्रियेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासक हेच ‘तिढा निवारण व्यावसायिक’ (आरपी) म्हणून कार्य करतील, असेही सूचित करण्यात आले आहे.

Exit mobile version