Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूण जखमी

Accident

जळगाव प्रतिनिधी । अहमदाबाद येथील तरूण रेल्वेने भुसावळकडे जात असलेल्या धावत्या रेल्वेतून कांचन नगरजवळ पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. कांचन नगर येथील रहिवाश्यांनी खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, सकाळी 9 वाजता जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेने 35 ते 40 वर्षीय प्रवास करत असतांना धावत्या रेल्वेतून कांचन नगर जवळील हनुमान मंदीराजवळ पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्याचवेळी कांचननगर येथील रहिवाशी लवकुश प्रसाद दिवेदी हे हनुमान मंदीराकडून घरी जात असतांना त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याचा मित्र शेषराव सोनवणे यांच्या मदतीने दुचाकीने तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उचारार्थ दाखल केले. दरम्यान जखमी व्यक्तीच्या मोबाईलवरून नातेवाईकांना संपर्क साधला असता त्याचे नाव पारस खंडेलवाल रा. अहमदाबाद एवढेच माहिती मिळाली. त्याचे नातेवाईक जळगावला येण्यासाठी रवाना झाले असल्याचे कळाले आहे. याबाबत अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version