Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुड भावनेच्या उद्देशाने राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनिया गांधीं यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. पाचोरा येथील तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी २६ जुलै रोजी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाप्रसंगी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.

 

आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर घोषणाबाजी ने दणाणून सोडला. यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष शेख ईरफान शेख मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद खान, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले सह पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलना प्रसंगी उपस्थित होते. आंदोलनानंतर पाचोरा काँग्रेसतर्फे तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांनी स्विकारले.

Exit mobile version