Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समता सैनिक दलाच्या राज्याध्यक्षपदी धर्मभूषण बागूल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समता सैनिक दलाच्या राज्याध्यक्षपदी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मभूषण उर्फ नानासाहेब बागुल यांची नियुक्ती करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

समता सैनिक दलात अतिशय तडफेने कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजसेवक नानासाहेब बागूल यांनी दलाच्या एकत्रीकरणात मोलाची भूमिका बजावली आहे. याची दखल घेत आता त्यांची थेट समता सैनिक दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांच्या आजवरच्या कार्याचा यथोचीत गौरव करण्यात आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, नानासाहेब बागूल यांची समता सैनिक दलाच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या विविध स्तरांमधून आणि मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version