Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव पालिका पोटनिवडणुक : पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर

bjp
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरी अखेर भाजप उमेदवार मधुकर रोकडे ६२७ मतांनी आघाडीवर आहेत.

 

धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण ५७.७३ टक्के मतदान झाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या या नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपसह राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून नीलेश सुरेश चौधरी, भाजपकडून मधुकर बन्सी माळी तर राष्ट्रवादीकडून नीलेश भागवत चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाजी शेख इब्राहिम उमेश, जानकीराम माळी, संजय एकनाथ माळी, महेंद्र सुभाष पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह चार अपक्ष असे एकूण सात उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Exit mobile version