Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावातून अल्पवयीन मुलीला पळविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेल्याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलीचे आईवडील हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार ५ जूलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना किरण अशोक चव्हाण याने तिचे अपहरण करून करून फूस लवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी किरण चव्हाण याच्यावर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ७ जुलै रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात किरण अशोक चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहे.

Exit mobile version