Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर तालुक्यात प्रशासनाच्या संगनमताने वाळूची चोरी

120april17 dhule2

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रूंदाडी येथील ठेका सुरू असून याठिकाणी वाळू साठा सावखेडामध्ये रात्री तांदूळवाडी याठिकाणी वाळूचा टप्पा लावण्यात येत आहे व प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक डंपर असेल किंवा ट्रॅक्टर असेल याला जीपीआरएस सुविधा एसएमएस सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर त्याठिकाणी सर्व गाड्या नियमाचे उल्लंघन करत आहे. हे सर्व प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे का? असा प्रश्न तेथील नागरिकांनी केलेला आहे.

वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी
काल रात्री त्या ठिकाणी पोकलॅण्ड जेसीबी वाळू वाहून नेणारे डंपर त्या गावातील लोकांनी जमा करून घेतले. व ग्रामपंचायतला लावून दिले पण तेथील तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. त्याठिकाणी प्रशासनाने समितीच्या सदस्यांना अपात्र होऊ शकतात असे शासन निर्णयात म्हटले आहे. पण अमळनेर येथील तहसीलदारांनी ती समिती घाटीत न करता ठेका सुरू केला आहे. याकडे प्रशासनाने अवैधरित्या वाहतूक वाळू वाहतूक सुरू असून ती लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version