धरणगाव विवेकानंद नागरी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव येथील विवेकानंद नागरी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. परंतु पतसंस्थेची निवडणूक पाचव्यांदा बिनविरोध झाली असून संस्थेचे संस्थापक ॲड. वसंतराव भोलाणे यांची पाचव्यांदा अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुधाकर शेट वाणी यांची बिनविरोध निवड झाली.

यानिवडीच्या वेळी धरणगाव तालुका उपनिबंधक ऑफिसचे सहकार अधिकारी ए. यु. तडवी उपस्थित होते. यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या चेअरमनपदी, व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. प्रथम संस्थेचे मॅनेजर वासुदेव महाजन यांनी निवडणुकीबाबत प्रस्तावना केली. त्यानंतर चेअरमन पदासाठी फॉर्म भरण्यात आला. निवडीच्या प्रसंगी संस्थेचे माजी चेअरमनकडू महाजन यांनी सूचना केली, की सन 2022 ते 2027 या वर्षासाठी सर्व संचालकाच्या वतीने सूचना केली की संस्थेचे संस्थापक एडवोकेट वसंतराव भोलाणे यांची निवड करण्यात यावी त्यांच्या सूचनेला संस्थेचे नवनिर्वाचित संचालक सत्यवान कंखरे यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर सहकार अधिकारी तडवी यांनी ॲड. वसंतराव भोलाणे यांचे नाव चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. त्यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी सूचक म्हणून मिलिंद पवार यांनी सूचना केली की, सुधाकर शेट वाणी यांची निवड करण्यात यावी, यासाठी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक प्रकाश जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन पदावर सुधाकर शेट वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सर्व संचालकांना व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना संस्थेचा कारभार चांगला चालण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन वसंतराव भोलाने, व्हाईस चेअरमन सुधाकर शेठ वाणी व संस्थेचे माजी चेअरमन कडू महाजन यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा व अभिनंदन केले.

याप्रसंगी संस्थेचे मॅनेजर वासुदेव महाजन व संस्थेचे संचालक सत्यवान कंखरे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांचे हि याप्रसंगी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्यात व त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सर्व संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच निवडणुकीच्या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित संचालक प्रकाश जाधव, डॉ. प्रशांत भावे, मिलिंद पवार, सत्यवान कंखरे, उषा वाघ, प्रतिभा चौधरी, सरला चौधरी, सुरेखा चौधरी, ॲड. वसंतराव महाजन, सुधाकर शेट वाणी हे सर्व संचालक निवडणूक प्रसंगी हजर होते. निवडणुकीची प्रस्तावना संस्थेचे वासुदेव महाजन यांनी केली आभार प्रदर्शन दत्ता चौधरी यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Protected Content