Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुका दिव्यांगाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुका राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तालुका बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. वसंतराव भोलाणे, जिल्हा मीडिया प्रमुख  टोनी महाजन,तालुका प्रमुख संजय पाटील, महिला जिल्हा प्रमुख प्रतिभा पाटील,तालुका संघटक रवींद्र काबरा, नगरसेवक सुरेश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुका प्रमुख संजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. दिव्यांग बांधवांमध्ये आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी मिठाच्या खडा टाकण्याचे काम करीत असून नेत्यांन मध्ये व आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून हे कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे दिव्यांग महासंघ एक संघ असून पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वात धरणगाव तालुका दिव्यांग महासंघ मोठ्या उत्साहाने काम करीत आहे. आमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कोण दिव्यांगांसाठी  अनेक वर्षांपासून काम करीत आहे हे सर्वांना माहीत आहे कोणताही मोबदला न घेता अहो रात्र आम्ही काम करीत आहोत.

या प्रसंगी ॲड. वसंतराव भोलाणे, टोनी महाजन यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात पी.एम. पाटील यांनी सांगितले. सर्व दिव्यांग बांधवांना घरकुल 35 किलो मोफत धान्य केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जोपर्यंत मिळवून देणार नाही, तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर आपल्याला उतरावे लागेल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने १५० दिव्यांग बांधवांना तात्काळ व्यवसायासाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल जवळजवळ ४२ हजार रुपये किंमत एकाची अशा दिल्या जाणार आहेत. व धरणगाव तालुक्यात ६ हजार दिव्यांग बांधव आहे व शहरात नऊशे दिव्यांग बांधव आहे. “या सर्वांना न्याय मिळवून देणार जो आपले काम करेल तोच आपला नेता” या उद्दिष्टाने सर्व दिव्यांग बांधव हे काम करीत असतात त्यांना कोणतीही अडचण भविष्यात येणार नाही, कोणी कितीही तुमचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्यावर अन्याय करेल, पी एम पाटील सर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सुतारे यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश पी.पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम उपस्थिती नंदू पाटील, रमेश चौधरी, विजय वारुळे, सुरेश अहिरे, पिंटू खर्दे, गजानन महाजन व

हजारो दिव्यांग बांधव बहिणी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Exit mobile version