Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : शिवसेना-उबाठा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणार्‍या शिवसेना-उबाठा पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवसेना-उध्दव बााळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात त्यांना भेटून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच पत्रकारांशी बोलतांना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते.ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.

दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ हे आपल्या सहकार्‍यांसह आज दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. अटक केलेल्यांमध्ये शिवसेना सह सं पर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नंदू भाऊ पाटील, संतोष सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अॅ.शरद माळी, विलास पवार, गजू भाऊ महाजन, देवा तायडे यांना यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांना धरणगाव पोलीस स्थानकात बोलवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Exit mobile version