Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

dharangaon news

धरणगाव प्रतिनिधी । येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘सामाजिक न्याय दिन’ निमित्त राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते पी.डी. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन खरा – खुरा इतिहास उलगडला.

 

शिक्षण, वसतीगृहे, वेदोक्त प्रकरण, बंधारे, धरणे, गुन्हेगारी जमातीला माणसात आणणारा, गंगाराम कांबळेला न्याय देणारा, बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन विदेशात पाठवणारा मोठ्या दिलाचा राजा, रयतेवर जीवापाड प्रेम करणारा व खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचे काम महाराजांनी केले असल्याचे प्रतिपादन वक्ते पी.डी.पाटील यांनी केले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.आर. महाजन सर यांनी या थोर महामानवाच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जे.एस.पवार तर आभार हेमंत माळी यांनी मानले. याप्रसंगी कार्य क्रमाच्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन होते. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी रत्ना महाजन हीने शाहू महाराजा विषयी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.एस. पवार यांनी प्रास्ताविक केले.

Exit mobile version