Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

dharangaon NCP news

धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रीवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आले. यावेळी त्यानिमित्तने पक्षाचा ध्वजारोहण करण्यात आला.

ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, युवकचे शहराध्यक्ष संभाजी कंखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश चौधरी, माजी गटनेते दीपक वाघमारे, अरविंद आबा देवरे, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, रंगराव सावंत, सागर वाजपेयी, गुलाब महाजन, सीताराम मराठे, मोहरा मराठे, अनिल पाटील, मावळे सर, दिनेश भदाणे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.

Exit mobile version