Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे यांचा प्रचार

madhukar rokde prachar

धरणगाव प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे (माळी) यांनी आज शहराच्या विविध भागांमध्ये प्रचार केला.

भाजपने लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी मधुकर बन्सी रोकडे (माळी) यांना उमेदवारी दिली आहे. आज प्रचार कार्यालयापासून त्यांनी प्रचारास प्रारंभ केला. यानंतर वाणी गल्ली, मराठे गल्ली, पारधी वाडा, हनुमान नगर, कुंभार वाडा, बलज पुरा आदी भागांमध्ये त्यांनी प्रचार करून मतदारांना आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version