Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणे येथे आढळले अर्भक; परिसरात खळबळ

धरणगाव अविनाश बाविस्कर | तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे झुडुपांमध्ये अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे आज झुडुपांमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्याने गावकर्‍यांना तेथे धाव घेतली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. येथे टाकून दिलेले अर्भक हे नवजात नसून ते तीन-चार दिवसे वयाचे असल्याचे जाणकारांना आढळून आले.

हे अर्भक नेमके कुणाचे आहे ? ते अनैतिक संबंधातून जन्माला आले की, मुलगी असल्याने कुणी टाकून दिले ? याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. तर ग्रामस्थांनी तातडीने या अर्भकाला धरणगाव पोलीस स्थानकाच्या स्वाधीन केले असून तेथे याबाबत नोंद करण्याचे काम सुरू आहे. तर या अर्भकाबाबत कुणाला माहिती असल्यास धरणगाव पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version