Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव ग्रामीण रूग्णालयासाठी सरसावले दाते !

धरणगाव प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात अत्याधुनीक सुविधांसाठी समाजातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केल्यानंतर याला शहरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव ग्रामिण रुग्णालय स्वंयपुर्ण होण्यासाठी आणि कोणत्याही साथीच्या आजारात किवा अपघात केस बरे होण्यासाठी नवनिर्वाचीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून एरंडोल विभागाचे प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी धरगांवातील व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, डॉक्टर असोशियन, मेडिकल असोशियन व दानशूर व्यक्ती यांना आवाहन केले होते. यात धरणगाव ग्रामीण रुग्नालयाचा ११ बेड ऑक्सीजन, पोर्टेबल ऐक्सरे, ईसीजी मशीन, अ‍ॅक्वा गार्ड मशीन, जनरेटर अश्या विविध सुविधा लोकसहभागातून तयार करावयाचे आहे असे त्यांनी आवाहन केले होते. त्याला धरणगावातून उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

प्रांताधिकार्‍यांच्या आवाहनानंतर गुलाबराव पाटील पालकमंत्री २५,००० /- ,शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व पदाधिकारी २५,००० /- ,नगरअध्यक्ष निलेश चौधरी व शिवसेना नगरसेवक २५,००० /- , प्रांताधिकारी विनय गोसावी १५,००० /-, तहसिलदार नितीन कुमार देवरे ११,००० /-,मुख्याधिकारी जनार्दन पवार ११,००० /- , बुर्‍हानी ट्रेडर्सचे खुजेमा बोहरी ११,००० /- , किशोर डेडिया ११,००० /- , सुनिल मालु ११,००० /- , तसेच मनोज लिलाधर वाणी रा.धरणगांव ह.मू.जळगांव यांनी शुध्द पाण्याचे अ‍ॅक्वा गार्ड मशीन देण्याचे कबूल केले आहे. त्यांनी रोख स्वरुपाचे चेक व उपकरणे तहसीलदार नितीन कुमार यांच्या कडे सुपूर्त केले आहेत.

दरम्यान, गावातील व्यक्ती, व्यापारी , सामाजिक संघटना विविध असोशियन, कर्मचारी संघटना यांनी पुढे येऊन मदत व सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल विभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे . ज्या दात्यांना रोख स्वरुपात किंवा रुग्णालयात लागणारे उपकरणे द्यायायचे असतील त्यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या कडे संपर्क साधून मदत करावी अशी विनंती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी केली आहे.

Exit mobile version