Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्राहकांची वीज जोडणी अकस्मात तोडू नका : पालकमंत्री

धरणगाव प्रतिनिधी | वीज ग्राहकाला बील भरण्यासाठी टप्पे करून संधी द्यावी, तसेच अकस्मात वीज जोडणी तोडू नयेत असे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथील बैठकीत दिले.

गेल्या काही दिवसांपासून महावितरणने थकबाकीमुळे घरगुरी ग्राहकांचे वीज कनेक्शन, पूर्वसूचना न देता कापण्याचा धडाका लावला आहे. याबाबत सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांनीनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. यावसर पालकमंत्र्यांनी धरणगाव येथे महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. कोणत्याही ग्राहकाचे कनेक्शन अचानक कापू नये, बिल भरण्यासाठी ग्राहकाला संधी द्यावी, तसेच ग्राकाला तीन टप्पे करून बिलाची वसुली करा, असे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान, धरणगाव पाणी पुरवठ्याचे एक्स्प्रेस फीडर असून तेथे भविष्यात वीज खंडीत होता कामा नये असे आदेश याप्रसंगी पालकमंत्र्यांनी दिले. धरणगावचे कार्यकारी अभियंता आर.एस.पवार, सहायक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर, अर्बन युनिटचे कनिष्ठ अभियंता एम.बी.धोटे यांची पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version