Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव सहकारी औदयोगिक वसाहत मंडळाची कार्यकारीणी बिनविरोध

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव सहकारी औद्योगीत वसाहत मंडळाची पंचवार्षीक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून याच चेअरमनपदी दिनकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

धरणगाव सहकारी औदयोगिक वसाहत मंडळ निवडणूक सन२०२२-२३ ते २०२६-२७ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात चेअरमनपदी दिनकर पंढरीनाथ पाटील तर दत्तात्रय आधार चौधरी यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. यासोबत संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य सह.औद्योगीक वसाहत फेडरेशन ली सांगली ता मिरज जि सांगली येथे संचालक म्हणून दिनकर पंढरीनाथ पाटिल यांची निवड सांगली येथे नुकतीच झाली.

दरम्यान, धरणगाव सहकारी औदयोगिक वसाहत मंडळ बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात चेअरमन- दिनकर पाटिल व व्हाईस चेअरमन म्हणून दत्तात्रय आधार चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली. यासोबत संचालक म्हणून एकनाथ हैबतराव पाटील, गोरख रामदास महाजन, प्रमोद गजानन गरूड, जीवनराव आनंदराव कुमावत, विजय मांगो महाजन; मियाजी लालख़ा पठाण, प्रवीण भिकमचंद ओस्तवाल; कैलास बाबुराव लोहार, आनंदा भालचंद्र पेंढारे, सौ वैंजतामाला सुरेश भागवत, सौ कल्पना पुनीलाल माळी आदींची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दळवी व हेमंत पाटील यांनी कामकाज पाहिले त्यांना संस्थेचे सेक्रेटरी रवींद्र पाटील यांनी मदत केली.

Exit mobile version