Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावला पासधारक विद्यार्थ्यांची पिळवणूक

धरणगाव प्रतिनिधी । एसटी खात्याच्या कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे येथील बस स्थानकावर पासधारक विद्यार्थ्यांना बराच काळ ताटकळत बसावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

येथील बसस्थानकात विद्यार्थ्याची पास काढणार्‍या कर्मचार्‍यांकडून पासधारक मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.कर्मचारी आपल्याच धुंदीत वावरत असून विद्यार्थी मात्र कुणीच वाली नसल्याने ही फरफट सहन करत असतात.अनेक मुलांना क्लासेस असतात शाळा असते आणि पास काढायची असते पण या कर्मचार्‍यांची काम करण्याची पद्धत मुलांना तासनतास ताटकळत ठेवते.हे कर्मचारी विदयार्थी रांगेत असतांना अर्धा अर्धा एक एक तास चहा,नास्ता घेण्याच्या बहाण्याने बाहेर फिरत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र तासनतास थांबावे लागते,बाहेर अपडाऊन करणार्‍या मुलांच्या गाड्या निघून जाण्याचे प्रकार घडतात.

नियमांच्या नावाने अडवणूक

एसटी खात्याचे कर्मचारी नियमाची आड दाखवून मुलांची अडवणूक करतात.अनेकदा मुलांच्या पासेस हरवतात.त्यांनी पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना लगेच पास मिळणे अपेक्षित आहे. पण काम टाळण्यासाठी हे कर्मचारी पास ज्या तारखेला संपते तेव्हाच पास मिळेल असे सांगतात. यामुळे समजा एका विदयार्थ्याने १ तारखेस पास काढली व २ तारखेस हरवली तर त्याने पुढच्या २ तारखेपर्यंत पास मिळण्याची वाट पहायची किंवा पैसे खर्च करून शाळा करायची का? हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करून बदल्या कराव्यात आणि मुलांची पिळवणूक थांबविण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version