Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचपुर्‍याजवळ भीषण अपघात : एक ठार, दोन जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचपूराजवळ कार आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला होता.

धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावजवळ काल रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात आयशर (एम.एच.१९ झेड. २००२) आणि वॅगनआर कार (क्र एम.एच.०४,डी.बी. ५९४२) यांची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात कार मधील नरेश पाटील (वय ३० हिरापूर ता. पारोळा) हा तरुण जागीच ठार झाला तर समाधान पाटील (रा.तांडा खडके ता. एरंडोल) हे जखमी झाला आहे. तसेच आयशर चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसिरातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

Exit mobile version