Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल, चोपडा तालुक्यात वादळी पावसाची हजेरी; मालमत्तेचे नुकसान (व्हिडीओ)

dhanora paus

धानोरा प्रतिनिधी । यावल आणि चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र झालेल्या वादळामुळे यावल व चोपडा तालुक्यातील परीसरात मालमत्तेसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चोपडा तालुक्यातील लोणी येथे वादळी पावसात लोणी गावाजवळ 2 वृक्ष कोलमोडून पडले. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतूक बंद झाली होती. तसेच धानोरासह परीसरात वादळामुळे मोठ्या केळी पिकावर संकट तसेच परीसरात लुकसानाचे लक्षणे दिसुन आलेले आहेत. उन्हामुळे होरपळणार्‍या जळगावकरांना आज २ जून रोजी दुपारी अचानक आलेल्या ढगांमुळे दिलासा लाभला. त्यातच जळगाव- भुसावळ रस्त्यावरील साकेगाव येथे पावसानेही हजेरी लावली होती.

एकीकडे हवामान खाते यंदा पावसाळा उशिरा असल्याचा अंदाज व्यक्त करीत असताना आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकाना दिलासा लाभला आहे. हा नियमित पाऊस नसल्याने असा अवेळी पाऊस आल्यानंतर अंदाजानुसार प्रत्यक्ष पावसाळा लांबण्याचीच शक्यता आहे. धानोऱ्यापासुन काहो अतरावरील मितावली येथे वादळात पत्रे उडून एका बैलाचा पाय कापला गेला आहे.

 

 

 

 

 

oplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture” allowfullscreen>

Exit mobile version