Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा

 

फैजपूर प्रतिनिधी ।  येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आज दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कारगिल विजय दिनानिमित्ताने ‘भारतीय सैन्याची विजय गाथा’ हा विशेष असा उपक्रम साजरा करण्यात आला.

यात धनाजी नाना महाविद्यालयाचे एन.सी.सी अधिकारी प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी विजय ऑपरेशन यावर दृक श्राव्य सादरीकरण केले. कारगिल येथील विजय ऑपरेशन या भारतीय सैन्याच्या वीर गाथेला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल भारतीय सेनेचा गौरव वाढविणे आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रत्येकाने देशासाठी आपल्या पातळीवर सहभाग देण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात धनाजी नाना महाविद्यालय खिरोदा येथील ५४, म्युनिसिपल हायस्कुल फैजपूर येथील १५, आ.ग. हायस्कूल, सावदा येथील ४२ आणि धनाजी नाना महाविद्यालयातील ५० अश्या १६१ एन.सी.सी.कडेट्स आणि ४ एन.सी.सी अधिकारी यांचा सहभाग होता.

तसेच कार्यक्रमाला प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपुत, चीफ ऑफिसर एस.एम. राजपुत, चीफ ऑफिसर संजय महाजन, चीफ ऑफिसर व्ही.एल.विचवे तर तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष दामोदर पाटील, चेअरमन लिलाधर चौधरी, व्हा.चेअरमन प्रा.के.आर.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा.पी.एच.राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य अनिल सरोदे, प्रा. डॉ.उदय जगताप, प्रा. दिलीप तायडे, सन्मा. प्राध्यापक शिक्षकेतर व कर्मचारी नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे आदींचे उपस्थितीती व मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाऱ्हे, सुधीर पाटील, संजीव तडवी, तोसिफ तडवी, दुर्गेश महाजन, दिपेश भुसे, यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version