Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सायंकाळी ५.३० पर्यंत ५७.७३ टक्के मतदान

 

धरणगाव, प्रतिनिधी | येथे आज (दि.२९) झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सायंकाळी ५.३० पर्यंत ५७.७३ टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी मात्र अद्याप उपलब्ध झालेली नाही.

 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ९४२१ पुरुष आणि ८५९५ महिला अशा एकूण १८०८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर या निवडणुकीचा निकाल लागणार असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते ? याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.

Exit mobile version