Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव पोटनिवडणुक : गोपाल पाटील यांचा अर्ज दाखल

WhatsApp Image 2019 12 12 at 7.49.07 PM

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री गोपाल पाटील यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.

संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री गोपाल पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पोटनिवडणूकीत आज गुरुवार १२ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोसावी तसेच मुख्याधिकारी श्री पवार यांचा कडे अर्ज दाखल केला. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष गोपाल पाटील, शहरअध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका उपाअध्यक्ष त्रंबक पाटील, कार्याध्यक्ष श्रीनाथ साळुंके, राकेश पाटील, मेघराज पाटील, तुषार पाटील, रुपेश जाधव, दीपक मराठे, ईश्वर चौधरी, भावेश पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version