Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनंजय कोल्हे राज्यस्तरीय ‘लेखक गौरव’ पुरस्काराने सन्मानित

bhusaval k

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगर येथील सार्वजनिक वाचनालयाचा २१व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते लेखक धनंजय कोल्हे यांना ‘लेखक गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

धनंजय हे एक चतुरस्त्र लेखक असून आजवर त्यांची उजेड पेरणारा माणूस, कर्मयोगी, उज्वल यशाचा मार्गदर्शक, वाचनालय एक प्रेरणास्रोत व लेवा आयकॉन्स अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांनी लिहिलेले लेवा आयकॉन्स हे पुस्तके तब्बल ७९० पानांचे तसेच ८ किलो वजनाचे अतिशय सुंदर तसेच नवीन तरुणाईला मार्गदर्शक करणारे पुस्तक आहे. यापूर्वी धनंजय यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देखील ‘नॅशनल नोबिलिटी अवार्डने’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version