Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : चौथीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | घरात कोणीही नसताना चौथीत शिकणाऱ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत सविस्तर की, म्हसावद येथील इंग्लिश मेडीयम शाळेत शिकणारा तालुक्यातील दहिगाव (संत) येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने राहत्या घरी घराच्या पहिल्या टप्प्यात छताला दोरी बांधून घरातील दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सहपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होते. गौरव याचा मोठा भाऊ कॄष्णा हा घराकडे गेला असता त्याने दरवाजा ढकलून बघितला असता तो आतून बंद दिसल्याने त्याने काका रविंद्र पाटील यांना ही माहिती देताच पाटील यांनी त्या घराकडे धाव घेत दरवाजा तोडून आत बघितल्यावर गौरव हा छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

याबाबत दहिगाव पोलिस पाटील विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. पाचोरा ग्रामिण रुग्णालयात स्वप्निल पाटील यांनी दाखल केले. यावेळी डॉ. अमित साळूंके यांनी शवविच्छेदन करून दहिगाव संत येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील यांनी दिली.

याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहेत. या दुदैवी घटनेने दहिगाव सह परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version