Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथे गुरूपौर्णिमेच्या दिंडीने भक्तिमय वातावरण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगावपासून डोणगावला जाणाऱ्या रोडवरील असलेल्या इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रोजी आषाढी एकादशी निमीत्त दिंडी काढण्यात आली.

किनगाव येथील चौफुलीवर व्ही.मार्ट किनगाव चौफूलीपासून काढण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुन्दर व आकर्षक असे वारक-यांची वेषभुषा परीधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा जयघोष करीत निघालेल्या या दिंडी सोहळ्यात स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

व्ही.मार्ट जवळ पालखीची पुजा करण्यात आली व इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनिष पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य राजश्री अहिरराव यांनी पालखी व दिंडी सोहळ्याचे स्वागत केले. पालकवर्ग व ग्रामस्थांनीही या दिंडी सोहळ्यास मोठया प्रमाणावर उपस्थित राहुन दाद दिली व सांस्कृतिक जपणूक करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हर्षल भास्कर मोरे, योगीता प्रकाश बिहारी, दिलीप बिहारी संगेले, देव्यानी शांताराम सोळुंके, मिलींद उत्तम भालेराव, भावना राजेंन्द्र चोपडे, प्रतिभा रमेश धनगर, गोपाळ जयवंत चित्ते, अनिल तापीराम बारेला, पवनकुमार विठ्ठल महाजन, संपत विरसिंग पावरा, दिनकर नागराज पाटील, नेहा तुषार धांडे, वैशाली रविंन्द्र धांडे, शाहरूख रशीद खान, सुहास प्रकाश भालेराव, प्रतिक एम.तायडे, पुजा डी.शिरोडे, तुषार नामदेव धांडे, बाळासाहेब पाटील यांचे परिश्रम व सहकार्ये लाभले.

Exit mobile version