Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवाची भक्ती केली तर आयुष्य लागते सार्थकी – हभप परमेश्वर महाराज उगले

जळगाव प्रतिनिधी । प्रेमाच्या बळावर भगवंतांची आवड संत तुकोबांना निर्माण झाली. संगती शिवाय आवड कळत नाही. देवाची महती अनन्यसाधारण आहे. देवाची भक्ती केली तरच आयुष्य सार्थकी लागते. परमेश्वर नामस्मरणातून परमार्थ लाभतो असे मार्गदर्शन नांदगाव येथील ह.भ.प. परमेश्वर महाराज उगले यांनी केले.

नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् संगीतमय भागवत कथा आणि हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हरिकीर्तन सप्ताहाच्या पाचव्या दिवशी हभप परमेश्वर महाराज उगले यांनी कीर्तनातून भाविकांना प्रबोधित केले.

परमेश्वर महाराज म्हणाले की, संतांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संतांचे कार्य मानव कल्याणासाठी होते. संतांचे चरित्र जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे, असेही ते म्हणाले.

रविवारी संध्याकाळी भागवताचार्य हभप सोपानदेव महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवराज फाउंडेशन तर्फे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी केले आहे.

 

 

 

 

Exit mobile version