Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाविकांचे ट्रॅक्टर उलटले : एकाची प्रकृती गंभीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ताजोद्दीन बाबांच्या दर्शनाला जात असलेल्या भाविकांचे ट्रॅक्टर उलटून आठ ते दहा भाविक जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, सातपुडा पर्वताच्या क्षेत्रात खान्देशवासी सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले बाबा ताजोद्दीन यांची दरगाह असून येथे दर्शनासाठी दर वर्षी हजारो भाविक जातात. या अनुषंगाने तालुक्यातील कोरपावली येथील भाविकांचा एक ट्रॅक्टर दिनांक १२ जुलै रोजी दुपारी  ४ वाजेच्या दरम्यान बाबा ताजोद्दीनच्या दर्शनासाठी निघाला होता. चोपडा तालुक्यातील वैजापूर जवळून जात असतांना या मार्गावर अचानक ट्रॅक्टर कोसळल्याने अपघात झाला.

 

या अपघातामध्ये सुमारे आठ ते दहा जण जखमी झाले असुन, अपघात स्थाळावरून तात्काळ जख्मींना चोपडा येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात एजाज समीर तडवी वय ( १५ वर्ष राहणार कोरपावली )या भाविकाला अधिक दुखापत झाली असुन त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच कोरपावली गावात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कुटुंबाची एकच धावपळ उडाली होती.

 

ट्रॅक्टर पलटी होवुन झालेल्यांना काल रात्री चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून सर्व जखमींवर उपचार करण्यात आले आहे. दरम्यान ट्रॅक्टर वरील ईतर भाविक सुखरूप असल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version