Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवगाव देवळी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक एस. के. महाजन, एन. जी देशमुख यांची उपस्थिती होती. अनिल महाजन यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक एस .के महाजन यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भातील भीती दूर करून परीक्षेला सामोरे कसे जावे या संबधित मौलिक मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीतील बारा विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केली.
शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरणात वार्षिक परीक्षेत इयत्ता आठवी प्रथम वीरेंद्र पाटील ,इयत्ता नववी प्रथम अश्‍विनी माळी , दहावीत प्रथम निकिता माळी यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
शाळेत कोण बनेगा प्रज्ञावंत या परीक्षेत एकूण १५ विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज व साने गुरुजी यांची वाचनीय पुस्तके प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला होता त्यात संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये पंकज पाटील इयत्ता आठवी ,लिंबू चमचा स्पर्धेत शुभम माळी; गितगायन स्पर्धेत
प्रथम माधवी सपकाळे ( इयत्ता दहावी) द्वितीय; विनेश वसावे (इयत्ता दहावी) तृतीय; सचिन जाधव (इयत्ता दहावी) या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

हिंदी राष्ट्रसभा पुणे यांच्यावतीने सुबोध प्रमोद परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यातील ४० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हिंदी राष्ट्रभाषा दिनानिमित्ताने हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्यात काही निवडक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती एसटी संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे बारा विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दहावीचे वर्ग शिक्षक यांनी स्वीकारले. शाळेतील स्पर्धा प्रमुख ईश्‍वर महाजन, अरविंद सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल महाजन शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के आय आर महाजन एस के महाजन एच.ओ. माळी व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन व आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी केले

Exit mobile version