Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच पिढ्यांना संधी देवूनही ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ : मुख्यमंत्री फडणवीस ( व्हिडीओ )

Devendra Fadnwis

अमळनेर (प्रतिनिधी) कॉंग्रेस देशाची गरीबी हटविण्याच्या बाता करतात. विशेष म्हणजे ज्यांच्या पाच पिढ्या सत्तेवर होत्या त्यांनी प्रत्येक वेळी ‘गरीबी हटाव’, असा नारा दिला. मात्र अद्यापपर्यंत गरीबी हटविली गेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा ‘गरीबी हटाव’चा जाहिरनामा काढणे म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’,असणे होय, असा घाणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. ते जळगाव लोकसभा मतदारसंघात चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

व्यासपिठावर यांची होती उपस्थिती
यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आमदार शिरीष चौधरी, आमदार उन्मेश पाटील, आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार चिमणदादा पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, अमळनेर नगरपालिकेच्या पुष्पलता पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी सभापती श्याम आहिरे, बाळासाहेब पाटील, जिल्हाउपाध्यक्ष अस्मिता पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे नेते डॉ पिंगळे, ॲड. व्ही.आर. पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आता गरीबाच्या खात्या 72 हजार रूपये खात्यात देवून गरीबी हटविणार असल्याचे सांगितले. ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी काँग्रेस आता करत आहे. पणजोबाला सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, आजीच्या हातात सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, त्यांच्या वडीलांच्या हतात सत्ता दिली त्यांनी गरीबी हटविली नाही, त्यांच्या आईच्या हातात सत्ता दिली त्यांली गरीबी हटविली नाही आणि आता राहुल गांधी 72 हजार रूपये दरवर्षाल गरीबांच्या खात्यात जमा होईल असे सांगत गरीबी हटविण्याचे सांगत आहे. आज यांच्या बोलण्याकडे कोणाचा विश्वास नाही. कोठून देणार गरीबांना 72 हजार रूपये दरवर्षी, अशी पोकळ आश्वासने देवून मतदारांची फसवणूक करत आहेत.

काँग्रेस नेत्यांची झोप उडाली
काँग्रेसचे नेते रात्री झोपतात तर त्यांना मोदींजीचे स्वप्न पडतात. त्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, अचानकपणे झोपेतून उठून मोदी मोदी करत असतील. त्यांना ही निवडणूक झोपू देत नाही. त्यांन अस्वस्थ करणारी आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी संकल्पना मोदी सरकार यांनी राबविली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. जन धन योजना, शेतीची विमा योजना, ड्रीपची योजना, शौचालयाची योजना, घरकुलाची योजना यासाठी कोणालाही चक्र मारायची गरज नाही. योजनांसाठी कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची गरज नाही. योजनांचे पैसे थेट दिल्लीपासून खात्यात वर्ग होत आहे.

मोदी सरकाच्या काळात विविध योजना आणल्या
मोदी सरकारच्या काळात जीवनाच्या परिवर्तनामुळे विकास झाला आहे. पूर्वी 45 टक्के लोकांकडे शौचालय होते. आतापर्यंत हे प्रमाण 98 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. उज्वला गॅस योजना अंतर्गत गरीब व मजूर यांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत गरिबांना घरे देण्याचे संकल्पना मोदी सरकारने राबविण्यात आली होती. ज्यांना जागा नाही त्यांना जागा, ज्यांचे घर अतिक्रमाणात होते त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात आले. ग्रामीण आणि शहरातील गरिबाला घर देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. देशाच्या सरदाराला 75 वर्षे पूर्ण होतील त्यावेळी प्रत्येक गरिबाला घर स्वतःचे घर राहणार आहे. मुद्राच्या अंतर्गत 50 कोटी लोकांना 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात आले. यामध्ये थेट रक्कम खात्यात जमा होते दरवर्षी 75 कोटी हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. गेल्या तीन वर्षात या जिल्ह्यांमध्ये 2300 कोटी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला दिले आहे. दुष्काळात या महिन्यात आधी सात आठ महिनेपर्यंत रक्कम खात्यात जमा होत नव्हती मात्र मोदी सरकारच्या काळांमध्ये ही रक्कम दोन महिन्यात जमा होते. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल चाऱ्याचा प्रश्न असेल मोठ्या प्रमाणात त्याला मान्यता दिली. प्रशासनाला सूचना देण्यात आले असून आचारसंहितेच्या काळात सुद्धा आपल्या कामांची पूर्तता करा. दुष्काळात देखील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला दुष्काळीची रक्कम जमा व्हावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे सांगितले. पाडळसरे धरण प्रकल्प पूर्ण झाला तर या एकट्या पाडळसरे धरणातून तर तालुक्यातून 67 गावे सुजलाम-सुफलाम होतील असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, काळजी करू नका याचे काम हे गिरीश महाजन यांना देण्यात आले असून. त्यामुळे अपुर्ण आणि बंद पडलेला प्रकल्प त्या पाण्याचा पाण्याचा दिल्या त्याचे त्याचा प्रस्ताव पुढे दिलेला आहे निवडणूक झाल्यानंतर मी आणि गिरीश महाजनशी बोलून केंद्राची बोललेला आहे. नाबार्डच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी सांगितले.

Exit mobile version