Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात विकासकामांचा झंझावात : आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आलेल्या ६० लक्ष रूपयांच्या विकासकामांचे आज त्यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.

Image Credit Source: Live Trends News

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्र.क्र.१,२,३ व ४ मध्ये गटारी बांधकाम करणे या रू.६० लक्ष च्या निधीचे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी दि.९ जुलै रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या परिसरात आमदार चंद्रकांत पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. परिसरातील स्त्री-पुरूष याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामांमुळे सदर प्रभागांमधील नागरिकांचा लाभ होणार असल्याने त्यांनी आमदार महोदयांचे आभार मानले. तर, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण कटीबध्द असून लवकरच इतर प्रभागांमध्येही याच प्रकारे विकासकामांचा झंझावात सुरू होणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी छोटू भोई, अफसर खान ,गोपाळ सोनवणे, राजेंद्र हिवराळे,गणेश टोंगे, प्रफुल्ल पाटील, वसंत भलभले, निलेश शिरसाट,बबलू कोळी,मुकेश वानखेडे ,पियुष मोरे, ललित महाजन, संतोष मराठे, बिलकीस बी अमानउल्ला खान , नुसरत बी महेबुब खान, शबाना बी अब्दुल आरिफ , आरिफ आझाद , नुरमोहम्मद खान , युनूस खान, महेबुब मिस्तरी महेंद्र मोंढाळे, प्रवीण चौधरी, संदीप पाटील, तुषार बोरसे, दिपक नाईक, शकुर जमदार , जाफर अली, सलीम खान, जहीर खान, मुशीर मनियार, सलीम मणियार ठेकेदार, साबीर पटेल, आसिफ दुधवाले, प्रभाग ४ अनीस खान जमशेर खान ,दस्तगीर खान ,हामिद जमादार,ज़ाहिर भाई आरिफ मिस्त्री , कफील भाई, तौफीक भाई ,प्रभाग ३महबूब खान मिस्त्री,जब्बार भाई ,रऊफ खान मिस्त्री, फारूक खान, राशिद सलाम,प्रभाग २ मूसा पटेल,फिरोज भाई, यूनुस आज़ाद ,शाहरुख सैय्यद, मुबारक खान आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version