Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर पंचायत समितीतर्फे विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमांतर्गत शासनाच्या योजना जनतेपर्यंत चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असून या संकल्प रथाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी अशोक पालवे, नवल पाटील, शेखर काळे, शांताराम बिल्लोरे, विकास पवार, आनंदा लावरे, भाईदास चव्हाण, अण्णा पिठोडे, राहुल राजपूत, कैलास पाटील, शरद पांढरे ,निवृत्ती पाटील, सुरेश पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना गावोगावी खेड्यापाड्यात व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी शासनातर्फे आपला संकल्प विकसित भारत हा कार्यक्रम राबवला जात असून विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना त्यामध्ये कृषी विभागातील आदिवासी विकास योजना कृषी विभाग तहसील कार्यालय पंचायत समिती यांच्यासह विविध कार्यालय मार्फत शासनाच्या योजना दिल्या जात असून या योजनेची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला माहिती दिली जाणार असून वंचित घटकांपर्यंत योजना देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे.

Exit mobile version