Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षण क्षेत्रातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव सारख्या छोट्या शहरातून बीटेक आयटी पदवीधर रोहित जैन यांनी शिक्षण क्षेत्रात भारतातील पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावला आहे.

आज पर्यंत चित्रपट, वेब सिरीयल, मालिका व खेळाचे सामने, पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय सर्वांसमोर उपलब्ध होतात. उच्च शिक्षणासाठी किंवा शिक्षणा संदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी असा कोणताही पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध नव्हता. याकरता वरणगाव शहरातील रोहित जैन यांनी भारतातील शिक्षण क्षेत्रांमधील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे शिक्षण या प्लॅटफॉर्मवर ती मोफत मिळणार आहे आहे. सध्या अगम वॉच लर्न अँड अपलाय या नावाने पोटी प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेला आहे.

यासाठी कोणत्याही प्रकारची युजर्सकडून फी किंवा रजिस्ट्रेशन चार्ज घेतले जाणार नाहीत अशी माहिती रोहित जैन यांनी दिली आहे. रोहित जैन यांचे शिक्षण केंद्रीय विद्यालय ऑडनस फॅक्टरी वरणगाव येथे पहिली ते दहावीपर्यंत झाले आहे. अकरावी व बारावी शिक्षण राजस्थान कोटा  येथे केले व त्या पुढील शिक्षण के जे सोमय्या मुंबई येथे B.Tech (IT) येथे पूर्ण केले. अशा वरणगाव सारख्या छोट्या शहरांमधून शैक्षणिक क्षेत्रा मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित केल्याने रोहित जैन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Exit mobile version