Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणार राज्यातील देवस्थाने

मुंबई प्रतिनिधी | नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आज राज्यातील शाळांबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने ७ ऑक्टोबर पासून राज्यातील देवस्थाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसर्‍या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बर्‍याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहर्‍यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Exit mobile version