Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवश्री वानखेडे हिचे नीट परीक्षेत उज्वल यश

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील देवश्री संजयराव वानखेडे हिने  नीट परीक्षेत यश संपादित केले आहे. तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

देवश्री वानखेडे  हिने भारत सरकार नॅशनल मेडिकल कमिशन,राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(N.T.A.)मार्फत वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंटरस टेस्ट (N.E.E.T) .परीक्षेत ५६५ / ७२०  गुण  मिळालेले आहे. ती  सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट विद्यालयाची १२  वी विज्ञान (९४.६ ),%,एनटीएस,शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी आहे. तिच्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.ती श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील रहिवासी  भादूजी बालुजी वानखेडे यांची नात व शेठ ला.ना. सा.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजय वानखेडे व नूतन मराठा महाविद्यालयातील प्रा. हेमा  वानखेडे यांची कन्या आहे.

Exit mobile version