Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

bhusaval 1

भुसावळ प्रतिनिधी । गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला भुसावळ पोलिसांनी आज सकाळी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिश रमेश सपकाळे (वय- 21) रा.रमाबाई आंबेडकर नगर, अकलुद ता.यावल जि.जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे. सतिश सपकाळे शहरातील स्टेशन चौकी परीसरात चर्चजवळ सार्वजनिक जागी बेकायदेशीर गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली.

या गुप्त माहीती मिळाल्याने जळगाव पो.अधिक्षक पंजाबराव उगले, पो. अध्यक्षक भाग्यश्री नवटके, उप.पो.अधिकारी गजानन राठोड, भाग भुसावळ बाजार पेठ ठाण्याचे पो.नि.दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना नरेंद्र चौधरी, यासिन पिंजारी, दिपक जाधव पो.कॉ कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, तुषार पाटील यांनी कार्यवाही करत त्याला अटक केली आहे. यावेळी संशियत आरोपीजवळ 5 हजार रुपये किंमतीची एक गावठी कट्टा आणि पाचशे रुपये किंमतीचा एक जिवंत काडतुस आढळून आल्यास ते जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर भाग 6 गु.र.न 549/2019 आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा पुढील तपास पो.ना नरेंद्र चौधरी करीत आहेत.

Exit mobile version