देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी ६ जूनला होणार सुनावणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा| राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदानासाठी एक दिवसाच्या जामिनावर मुक्त करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. यावर विशेष न्यायालयाचे इडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून सोमवारी ६ जून रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणुक मतदान आहे. अनिल देशमुख हे कायमस्वरूपी आमदार आहेत. राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्याच्या मतदानासाठी १० जून रोजी एक दिवसाच्या जामिनावर मुक्तता करण्याची मागणीसाठी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात धाव घेत न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे.

यावर विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी, इडीकडे या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून अर्जदाराने त्याला मतदानाचा हक्क पूर्ण करायचा आहे. राज्यसभेसाठी मतदान विधानभवनाच्या आत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या एस्कॉर्टची कमतरता भासणार नसल्याचे या अर्जात असे नमूद करण्यात आले असल्याचे म्हटले असून यावर सुनावणी ६ जून रोजी होणार आहे.

Protected Content