Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वंचित बहुजन आघाडीत फुट ; एमआयएम स्वतंत्र निवडणूक लढवणार

794852 prakash ambedkar and asaduddin owaisi dna

 

मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असे सांगत एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपावरील वादातून अखेर फूट पडली आहे.

 

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नव्हती. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज जाहीर केले.

Exit mobile version