दीपककुमार गुप्ता यांना हद्दपार करा; रिपाइं युवक महानगर आघाडीची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावरील पोलीस संरक्षण कमी करून त्यांना दोन वर्षांकरीता जिल्हा हद्दपार करावा या मागणीसाठी गुरूवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रिपाइं युवक महानगर आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे युवक महानगराध्यक्ष मिलींद सोनवणे यांच्या नेतृत्वात हे निर्दशने करण्यात आले. रिपाइंने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावर असलेल्या राज्यभरातील गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण  काढून त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरीत हद्दपार करावे या मागणीसाठी ७ जानेवारी रोजी पासून रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने साखळी उपोषणाला बसले आहे. परंतू प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या युवा आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतरही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यास भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे.

याप्रसंगी अक्षय मेघे, मुकेश सपकाळे, अविनाश पारधे, दिनेश सोये, सागर सपकाळे, गणेश सुर्यवंशी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content