Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील दोघे जिल्ह्यातून हद्दपार

IMG 20180902 WA0035

फैजपूर / जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूक तसेच सण,ऊत्सवामध्ये सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुवस्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यावल तालुक्यातील दोन जणांना फैजपूर प्रांताधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, यावल येथील विजय बंडु गजरे (रा.पंचशिलनगर) व फैजपूर येथील शेख आरीफ शेख कलीम ( रा.मिल्लतनगर) या दोघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वर्तवणुकीमुळे भविष्यात सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्याने विजय बंडु गजरेला २ वर्षे तर शेख आरीफ शेख कलीम याला १ वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीतुन हद्दपार करण्यात आलेले आहे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक तसेच फैजपूर व यावल शहरात व सभोवतालीच्या परिसरातील आगामी सण,ऊत्सवामध्ये सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुवस्वस्था याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये दोघांना हद्दपार करण्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत.

Exit mobile version