Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम-2021 करीता 100 किलो बियाणे प्रती हेक्टर याप्रमाणात आलेल्या उत्पादनातुन सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

सोयाबिन पिकाची सद्य:स्थितीत काढणी व मळणी सुरु असुन आलेल्या उत्पादनातुन चांगल्या प्रतीचे सोयाबिन बियाणे राखुन ठेवून ते पुढील खरीप हंगामात बियाणे म्हणून वापर करावा. साठवणुक करतांना सोयाबिन बियाणे गोणीची थप्पीची उंची ७ फुटापेक्षा जास्त ठेऊ नये. सोयाबिन बियाणाचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी. पुढील हंगामासाठी घरचे बियाणे राखुन ठेवल्याने शेतकरी बांधवांना बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही. असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version