Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांचे निदर्शने !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांच्या वतीने आज सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी द्वारसभा घेवून वीज कर्मचाऱ्यांनी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच केंद्र व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.

पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेश मध्ये केंद्र सरकारने वीज उद्योग १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी निविदा प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.संपूर्ण वीज क्षेत्र खाजगीकरणच्या माध्यमातून भांडवलदारांना देण्याच्या पॉंडेचेरी सरकारच्या निर्णयाचात्याच्या निषेधार्थ व सदर निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच वीज वितरणाचा सर्वांत मोठा महसूल व नफा मिळवून देणारे क्षेत्र ताब्यात घेण्याचा अदानी इलेक्ट्रिकल चा डाव आहे. सहा जलविद्युत केंद्र प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, महपारेषण मध्ये अदानी चा प्रवेश हे दोन्ही निर्णय रद्द करावेत अशी मागणी विज कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली असून वरील दोन्ही निर्णय रद्द व्हावे यासाठी आज महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने दि.४ऑक्टोबर रोजी राज्य भर निदर्शने करून काळा दिवस पाळण्यात आला. त्यानिमित्त महावितरण जळगाव परिमंडळ कार्यालय समोर जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त करून आज मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता द्वार सभा संपन्न झाली.

आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ. विरेंद्रसिंग पाटील, सबार्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पराग चौधरी, कुंदन भंगाळे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस के लोखंडे, बहुजन वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघटनेचे विजय सोनवणे, बहुजन वीज पॉवर कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांनी संबोधित करताना सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. सदर आंदोलन मध्ये कॉ. प्रकाश कोळी, सागरराज कांबळे, किशोर जगताप, योगेश भंगाळे, मोहन भोई, प्रियतमा बुंदेले, विनोद आनंदा सोनवणे, विशाल पाटील, प्रभाकर महाजन, चेतन नांगरे, संदीप कोळी, राहुल वडनेरे, विजय मराठे, कुंदा धनके, यांच्यासह वीज कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता.

Exit mobile version