Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो.से.हायस्कूलमध्ये ‘पेपर मॉडेलिंग’चे प्रात्यक्षिक !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गो. से. हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयांतर्गत पेपर मार्बिनिंग (Paper Marbling) या प्रकल्पाचे इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले.

या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे पेपर मार्बलिंग केली जाते याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा अनुभव येऊन विद्यार्थ्यांनी स्वतः पेपर मार्बलिंग करून बघितले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. सदरचा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाला. यावेळी सूत्रसंचलन आर. बी. बोरसे यांनी केले.

प्रकल्प कशाप्रकारे करायचा आहे याचे मार्गदर्शन वैशाली कुमावत यांनी केले. याप्रसंगी इंग्रजी विषय शिकवणारे सर्व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पेपर मार्बलिंग चे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक प्रितम पाटील, कलाशिक्षक सुबोध कांतायान, प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच इंग्रजी शिक्षक नीता पाटील, सागर पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Exit mobile version